रोणापाल मडूरा तिठा येथे हनुमान जयंती सोहळा
बांदा (प्रतिनिधी)दि २२ एप्रिल २०२४
रोणापाल – मडूरा तिठा येथील दक्षिणामुखी श्री हनुमान मंदीरात मंगळवार २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्त सकाळी श्रींची पूजाअर्चा, ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने होतील. ७ वाजता सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचा ‘कृष्ण मारुती युद्ध’ हा पौराणिक नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान देवस्थान समितीमार्फत करण्यात आले आहे.





