आंब्रड बाजार येथील श्री.हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा

46

आंब्रड बाजार येथील श्री.हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा

२२ एप्रिल ते २३ एप्रिल रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी)दि २२ एप्रिल २०२४

कुडाळ तालुक्यातील आंब्रड बाजार येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा सोमवार दि. २२ एप्रिल ते मंगळवार २३ एप्रिल या कालावधीत श्री हनुमान मंदिर, आंब्रड बाजार येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.या निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सोमवार दि. २२ एप्रिल सकाळी ९.०० ते ११.०० : अभिषेक, श्री भगवती देवी, श्री देव चव्हाटा, श्री देव ढालकाठी, श्री देव महापुरुष, श्री बजरंग बली,सायं. ५.०० ते ६.१५
सकाळी ११.०० ते दुपारी १.००: श्री सत्यनारायणाची महापुजा, आरती, तीर्थप्रसाद : सामुदायिक हरिपाठ
सायं. ६.३० ते ८.३०,किर्तन, वारकरी संप्रदाय, आंब्रड रात्रौ ९.०० ते १२.००,दिंडी कार्यक्रम-आकर्षक चित्ररथासह ढोल ताशांच्या तालावर मंत्रमुग्ध, करणारा दिंडी सोहळा रात्री १२.३० ते ५.३०,खानोलकर दशावतारी नाट्य मंडळ, खानोली प्रस्तुत “महान पौराणिक दशावतारी” नाट्य प्रयोग,मंगळवार दि. २३ एप्रिल पहाटे ५.३० ते ७.०० श्री.हनुमान जन्मोत्सव सोहळा (कथाकथन, तीर्थप्रसाद, नवस फेडणे व नवस बोलणे) दुपारी १२.३० ते ३.००महाप्रसाद, सहभोजन,सायं. ४.३० ते ६.०० हळदीकुंकू,सायं. ७.०० ते ९.०० हरीपाठ, वारकरी संप्रदाय पोखरण,रात्रौ ९.३० ते १.००भव्य सांस्कृतिक कार्यक्रम,श्री.कलेश्वर नाट्य मंडळ नेरूर प्रस्तुत ट्रिकसिन सहित महान पौराणिक नाट्य प्रयोग ,कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर, कुडाळ यांचाअजिंक्यतारा हा‌ नाटयप्रयोग,सत्कार समारंभ रात्रौ ११ ते ११.३० वाजता,सन २०२३ साली श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालयातून इयत्ता दहावीमध्ये १ ते ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार,दि २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता निमंत्रीतांची रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे.

भाविक भक्तांनी हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहुन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ,असे आवाहन आंब्रड बाजारवाडी हितवर्धक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.