राणेंना भाजप कडून लोकसभेची उमेदवारी जाहीर ;कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौकात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करत साजरा केला जल्लोष
कणकवली दि १८ (प्रतिनिधी )
सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. राणे यांच्या समर्थनाथ घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.

यावेळी राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजना सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अभी नाईक,जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, अॅड. समीर सावंत, माजी नगरसेवक शिशीर परुळेकर, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, कलमठचे उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, कळसुली सरपंच सचिन पारधिये, आशियचे सरपंच महेश गुरव, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, परशुराम झगडे, निखिल आचरेकर, दत्ता काटे, सुशील पारकर, सुभाष मालंडकर, अमजद शेख, राजा पाटकर, नवू झेमणे, तेजस लोकरे, कलमठ ग्रा. पं. सदस्य पप्पू यादव, श्रेयश चिंदरकर, बाबू घाडीगावकर, राजू हिर्लेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘नारायण राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘हमारा नेता कैसा हो नारायण राणे जैसा हो’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो’ अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी करत परिसर दणाणून सोडला.
महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. याचा कार्यकर्त्यांना आनंद झाला असून त्यांना निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून त्यांना अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणू, असा विश्वास माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केला.
नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणे आपल्या मुळगावी वरवडे येथे रवाना झाले. एसटी बसस्थानक येथे राणेंचे आगमन होताच त्यांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,समीर नलावडे, संजना सावंत, मेघा गांगण स्वागत केले. यावेळी ‘नारायण राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करत फटक्यांची आतषबाजी केली.





