Home महाराष्ट्र कणकवली रत्नागिरी-सिंधुदुर्गात लोकसभा उमेदवारी किरण सामंत यांनाच मिळायला हवी – संजय आग्रे

रत्नागिरी-सिंधुदुर्गात लोकसभा उमेदवारी किरण सामंत यांनाच मिळायला हवी – संजय आग्रे

4

रत्नागिरी-सिंधुदुर्गात लोकसभा उमेदवारी किरण सामंत यांनाच मिळायला हवी – संजय आग्रे

विनायक राऊत यांनी दहा वर्षांत एकही विकासात्मक काम केले नाही.

कणकवली (प्रतिनिधी) दि.८ एप्रिल २०२४

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचे किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळायला हवी अशी आग्रही भूमिका शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांनी आज येथे मांडली. तसेच विद्यमान खासदार विनायक राऊत यांना गेल्या दहा वर्षात एकही विकासात्मक काम करता आलेले नाही अशी टीका देखील त्यांनी केली.

येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात श्री. आग्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, भास्कर राणे, तालुकाध्यक्ष भूषण परुळेकर, शेखर राणे, सुनील पारकर, प्रमोद मसुरकर व इतर उपस्थित होते. श्री. आग्रे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांची नाळ ही धनुष्यबाण या चिन्हाशी जुळलेली आहे. त्यामुळे या निशाणी वरचाच उमेदवार हवा यासाठी आम्ही आग्रही आहोत. दरम्यान उद्या गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कणकवलीत या मतदारसंघातील युतीच्या उमेदवार प्रचार कार्यालयाचे उद्घाटन देखील केले जाणार आहे.

ते म्हणाले, या मतदारसंघात किरण सामंत हे इच्छुक आहेत. त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी इथल्या असंख्य शिवसैनिकांची मागणी आहे. तशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विकास करायचा तर इथला खासदार सक्षम असायला हवा.

कोकणात आलेल्या विकास प्रकल्पांना विरोध एवढेच काम त्यांनी केलेले आहे. या मतदारसंघात युतीचा जो उमेदवार निश्चित होईल, त्याला आम्ही अडीच लाख मताधिक्याने विजयी करू असा विश्वास देखील श्री. आंग्रे यांनी व्यक्त केला.