बांद्यात आज संत सोहिरोबानाथ जयंती सोहळा…!

बांदा  : बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठामध्ये गुरुप्रतिपदेला सोमवार दि. 6 फेब्रुवारी रोजी संत सोहिरोबानाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मठात सकाळपासुन विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या जयंतीसोहळ्या पासुन श्रीरामनवमीपर्यंत मठात नाथ सेवा उत्सव चालणार आहे.

सोमवारी सकाळी संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुकांची पुजा अर्चा, अभिषेक होईल. त्यानंतर  तीर्थप्रसादास प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजता संत सोहिरा चरित्रामृताचे वाचन होईल.

सायंकाऴी 5 वाजता  स्थानिक महिलांची भजन सेवा होईल. सायं 7.30 वाजता नित्य सायंआरती होईल. त्यानंतर स्थानिक भजनकर्मींची भजनसेवा होईल.

नाथांच्या जयंतीपासून नाथ सेवा उत्सव आरंभ होत आहे.  नित्य मंगळवारची  भजन सेवा व गुरुवारची माध्यान्ह आरती यांच्यासह उत्सवकाळात दर मंगळवारी सायं 5 ते 6 या वेळेत श्रीराम नामाचा जप  होणार आहे. तसेच दर गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 महिला भजनकर्मींची भजनसेवा होणार आहे. हा नाथ सेवा उत्सव नाथांचा निर्याणदिन असलेल्या रामनवमी पर्यंत  चालणार आहे.

या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संत सोहिरोबानाथ सेवेकरी भक्त परिवारातर्फे  करण्यात आले आहे.