बांदा येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे उदघाटन

20

बांदा येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे उदघाटन

बांदा (मंगल कामत)दि २ एप्रिल २०२४

पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत कै माधव हरी अळवणी सभागृह मोर्येवाडी बांदा येथे आज दि 2 एप्रिल 2024 रोजी सकाळी संयुक्त योगोपचार शिबिराचे उदघाटन करण्यात आले . या शिबिराला उद्घाटक म्हणून पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर लाभले.
त्यावेळी सोशल मीडिया तहसील प्रभारी लक्ष्मण पावसकर, किसान सेवा समिती सावंतवाडी तहसिल प्रभारी संतोष मोरे,  संजय नाईक,  आपा चिंदरकर, भीमराव सावंत , सौ स्वेता कोरगावकर, सौ राजश्री तेंडले आदी मान्यवर उपस्थित होते.
दिप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाप्रभारी  शेखर बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पावसकर , तर आभार प्रदर्शन  संजय नाईक यांनी केले . सदर शिबिरास योगाभ्यास प्रेमींनी , तसेच गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला.
बांदा ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी मंडळ लि बांदा संस्थेच्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे सभागृह, स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. सदर योगशिबिर 2 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत निःशुल्क चालू राहील त्याचा योगाभ्यास प्रेमी व्यक्तींनी लाभ घ्यावा तसेच निरोगी आरोग्यासाठी योगाभ्यास करणे या सारखे दुसरे औषध नाही असे उदघाटक बांदेकर यांनी सांगितले.