गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक करताना दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दोघांवर कारवाई; इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई

98

गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक करताना दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दोघांवर कारवाई; इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई

बांदा (प्रतिनिधी) दि २९ मार्च २०२४

ओटवणे रोडवर राज्य उत्पादन शुल्क इन्सुलिपथकाच्या टीम कडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलय. दोघांकडून दहा लाखाच्या मुद्देमालासह बोलेरो पिकप जप्त करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र वाहनांची तपासणी होते आहे. गोव्यातून येणाऱ्या एमएच ४७ वाय १९१७ मालवाहू महिंद्रा पिकप तपासणीसाठी थांबवण्यात आली. यावेळी कांद्याच्या गोणी खाली लपून ठेवलेले विदेशी मद्याचे ५० बॉक्स आणि ३० बियर चे बॉक्स अवैधरित्या आढळून आले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक वायदंडे, रणजीत शिंदे यांनी केली. विशाल पठारे आणि धोंडीराम गायकवाड अशी त्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली आहे. अधिक तपास तानाजी पाटील करत आहेत.