ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांना पुत्रशोक | ओमकार राणे यांचे निधन

कणकवली : कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांचे सुपुत्र व जानवली घरटनवाडी येथील रहिवासी ओमकार शशिकांत राणे ( वय २८) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओमकार राणे हे कणकवली कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते.

काल पासून त्यांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला होता. आज सकाळी ते कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, चुलते असा मोठा परिवार आहे. मन मिळवू स्वभावामुळे ओमकार याचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्यावर आज जानवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.