राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील नवनियुक्त्या जाहीर ; यामध्ये राकेश नेवगी यांची सावंतवाडी शहर कार्याध्यक्षपदी यांची निवड 

57

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील नवनियुक्त्या जाहीर ; यामध्ये राकेश नेवगी यांची सावंतवाडी शहर कार्याध्यक्षपदी यांची निवड 

सावंतवाडी (प्रतिनिधी)दि २६ मार्च २०२४

सावंतवाडी- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील नवनियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत, यामध्ये कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते राकेश नेवगी यांची सावंतवाडी शहर कार्याध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आणि नियुक्ती पत्र देखील देण्यात आले,यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सौ.अर्चनाताई घारे-परब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.

पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी राकेशजी जोमाने काम करतील असा विश्वास सौ.अर्चनाताई घारे परब यांनी दाखवला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राकेश नेवगी हे जुन्या नवीन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यकारिणी लवकरात लवकर तयार करावी. यामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी तयार करण्यात येऊन कामाला लागावे अशा सूचना देखील सौ.अर्चनाताई घारे परब यांनी केल्या.

सदर नियुक्ती प्रसंगी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक,सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस तसेच सूरज खान, जउर खान,जॉनी फर्नाडिस, काशिनाथ दुभाषी,इफ्तिखार राजगुरू आणि महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी आदी उपस्थित होते.