वाद जमिनीचा ; हल्ला कोयत्याचा ,हाड मोडला पायाचा पहा कोठे ते
जमीन वादातून कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी बांदा सटमटवाडी येथील सुभाष परब यांच्यावर गुन्हा दाखल
सावंतवाडी (प्रतिनिधी)दि २३ मार्च २०२४
गाळेल परबवाडी येथे जमिनीचे वादातून आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या हाणामारी मध्ये नारायण सुरेश परब हे गंभीर दुखापत ग्रस्त झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील गाळेल परबवाडी येथील परब कुटुंबियांमध्ये जमिनीच्या वादातून भांडण झाले आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झाले.सुभाष राजाराम परब यांनी नारायण सुरेश परब यांच्यावर कोयत्याने हल्ला करत त्यांना जखमी केले.या हाणामारी मध्ये नारायण परब यांच्या उजव्या पायाची दोन हाडे मोडली असून त्यांच्यावर सावंतवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पायाचे हाड मोडल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याची नितांत गरज असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे अशी माहिती नारायण परब यांच्या नातेवाईकांनी दिली.बांदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून सुभाष राजाराम परब वय 50 वर्षे राहणार सटमटवाडी याच्यावर 324 व 352 प्रमाणे बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास ए एस आय पालकर करत आहेत





