बांदा वासियांच्या पदयात्रांचा सांगता सोहळा मोरगाव श्री म्हातारेबाबा देवस्थान येथे संपन्न 

106

बांदा वासियांच्या पदयात्रांचा सांगता सोहळा मोरगाव श्री म्हातारेबाबा देवस्थान येथे संपन्न 

बांदा (प्रतिनिधी) दि २० मार्च २०२४

बांदा – बांदा ग्रामस्थ मंडळींची वार्षिक  पदयात्रांचा सांगता सोहळा मोरगाव येथिल प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. मंगळवारी पदयात्रींनी बांदा येथुन चालत जाऊन मोरगावात श्री देव म्हातारेबाबा चे दर्शन घेतले. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सांगता सोहळा संपन्न झाला.
सकाळी श्री बांदेश्वर भुमिका दर्शन घेऊन पदयात्रींनी प्रस्थान केले. मोरगाव येथे श्री म्हातारेबाबा मंदिरात पोहोचल्यावर दर्शन घेऊन सामुदायिक नामस्मरण करण्यात आले.त्यानंतर भजनसेवा कार्यक्रम झाला. दुपारी महानैवेद्य व महाआरती होऊन महाप्रसादाला आरंभ झाला.भाविक महिला सेवेकरींनी महाप्रसादाचे संपुर्ण नियोजन
शेकडो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ते माणगांव पदयात्रेने या उपक्रमाचा आरंभ झाला.
त्यानंतर दाणोली श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर,कास येथिल श्री वाघबिळकार देवस्थान,सोनुर्ली श्री देवी माऊली,श्री घोडेमुख देवस्थान मातोंड,श्री रामभट स्वामी समाधी मंदिर,मठपर्वत – सटमठ आदी पदयात्रा झाल्या.शेवटी
मोरगाव येथिल श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथील पदयात्रेने त्याची सांगता झाली.पदयात्रेने धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन तीथे नामस्मरण व भजन करणे व त्याद्वारे आध्यात्मिक उपासनेचा लाभ मिळवीणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी सांगितले.