शिरवली ग्रामपंचायत, अंगणवाडी नूतन इमारतीचे नितेश राणेंच्या हस्ते उदघाटन…!

देवगड : देवगड तालुक्यातील शिरवली गावातील नूतन अंगणवाडी केंद्राचे व नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्धाटन आमदार नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी भाजप पदाधिकारी महेश उर्फ बंड्या नारकर, म्हावळुंगे सरपंच संदीप देवळेकर, शिरवली माजी सरपंच सौ. भक्ती जठार, माजी उपसरपंच सौ.सविता पोयरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पोयरेकर, पोलीसपाटील बींदुसार नांदगावकर, ग्रामसेवक मलगुंडे आदी भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते