आयुर्वेदात अनेक रोगावर अनेक उपचार पद्धती, अनेक औषधे आपल्या अवतीभवती – शंकर नार्वेकर
बांदा (प्रतिनिधी)
आयुर्वेदात अनेक रोगावर अनेक उपचार पद्धती, अनेक औषधे आपल्या अवतीभवती असतात. अनेक मासिकांमध्ये आलेली उपयुक्त माहिती संग्रहित करून ती सर्वसामान्यांना उपयुक्त व्हावी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक शंकर नार्वेकर यांच्या पुस्तकाच प्रकाशन ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेमध्ये नटवाचनालय सभागृह बांदा इथ पार पडले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रुपेश पाटकर, मानसोपचार तज्ञ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, डॉक्टर संजय बर्वे, भाजपा महिला प्रमुख जिल्हाप्रमुख श्वेता कोरेगावकर, शंकर नार्वेकर आदी उपस्थित होते.
उतार व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याकडे असलेली ज्ञानाची शिदोरी, मग त्यामध्ये रितीरिवाज असतील, काही जुनी माहिती असेल, संस्कार असतील, तर ते त्यांनी आपल्या या पिढीला देऊन भावी पिढीला सक्षम करण्यास मदत करावी. दिवसेदिवस आपल्या या पिढीवर संस्कार मिळत नाहीयेत. त्यासाठी ज्येष्ठांनी याचा पुढाकार घेऊन हे संस्कार या पिढीला द्यावे. अस प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर पाटकर म्हणाले.
नार्वेकर सरांनी संग्रहित माहिती करून ती समाजासाठी उपयुक्त ठरावी म्हणून पुस्तक रूपात ठेवली याचा आपल्याला खूप आनंद होत असल्याचे सांगून अशाच प्रकारे ज्येष्ठांनी समाजाला मार्गदर्शन करावे असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक लिखाणाच्या कामात ज्या अनेक व्यक्तींनी सहकार्य केलं, त्या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचवेळी माजी शिक्षक नार्वेकर यांना त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडून धन्वंतरी ची मूर्ती देण्यात आली. उपस्थितांनी शंकर नार्वेकर यांच्या बद्दल बोलताना त्यांची चिकित्सक बुद्धी, उपक्रमशील शिक्षक कसा असावा अशा शब्दात त्यांचा गौरव केला. यावेळी बांदा जेष्ठ नागरिक संघाचे बहुसंख्य जेष्ठ नागरिक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि कार्यक्रमाच प्रास्ताविक धामापूरकर सरांनी केले.






