Home देवगड देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर सुरू झाल्याने समाधान

देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर सुरू झाल्याने समाधान

16

देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर सुरू झाल्याने समाधान

युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

देवगड, (प्रतिनिधी)दि.१४ मार्च २०२४

देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलेसिस सेंटर गेल्या काही दिवसापासून बंद असून रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता डायलेसिस सेंटर दोन दिवसात सुरू करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी दिला असता ग्रामीण रुग्णालयातील डायलेसिस सेंटर पुन्हा सुरू झाल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलेसिस सेंटर हे गेले कित्येक दिवस बंद असून सदर प्रकार गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा घडला आहे त्यामुळे देवगड मधील डायलेसिसच्या पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलला जावे लागत आहे त्यामुळे डायलेसिसच्या रुग्णांची गैरसोय होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो डायलेसिस मशीन येत्या दोन दिवसात सुरू झाली नाही तर आम्ही युवा सेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन करू असा इशारा युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी निवेदनाद्वारे वैद्यकीय अधीक्षक यांना दिला असता गुरुवारी डॉक्टर संजय विटकर यांची भेट घेतली असता डायलेसिस सेंटर पुन्हा एकदा सुरू झाले असल्याची माहिती युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांना दिली.

यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.