वरची मळेवाड येथील ज्येष्ठ दशावतार कलाकार काशीनाथ मेस्त्री यांचे निधन
सावंतवाडी (प्रतिनिधी) दि १३ मार्च २०२४
सावंतवाडी – वरची मळेवाड येथील ज्येष्ठ दशावतार कलाकार (हार्मोनियम वादक) श्री काशीनाथ शिवराम मेस्त्री (पांचाळ वय 92) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यानी आपल्या कार्यकाळात अनेक नामवंत दशावतार नाट्य मंडळात हार्मोनियम वादनातून रंगदेवतेची सेवा केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, भाउ भावजयी, नातवंडे पुतण्या,पुतणी असा मोठा परिवार आहे.नवोदित भजनी बुवा ओमकार श्रीकांत मेस्त्री यांचे ते आजोबा होत.





