देवगड संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न

329

देवगड संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न

संजय गांधी योजनेअंतर्गत २७ ,वृध्‍दापकाळ ४ तर श्रावणबाळ योजनेंतर्गत १८ प्रस्‍ताव मंजूर

देवगड ( प्रतिनिधी) दि ५ मार्च २०२४

गरजू आणि पात्र निराधार लाभार्थी संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व वृध्‍दापकाळ योजनेच्‍या लाभापासून वंचित रहाता नये हीच आमची सर्वाची भावना असल्‍याचे मत संजय गांधी योजना समिती देवगडचे अध्‍यक्ष संतोष किंजवडेकर यांनी समिती बैठकित व्‍यक्‍त केले.
देवगड तालुका स्‍तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक
अध्‍यक्ष संतोष किंजवडेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. यावेळी समिती सदस्‍य वैभव करंगुटकर, संजना आळवे,अमित साळूंके,संतोष जंगले, प्रकाश जंगले,सुहास राणे,शैलेश लोके,प्रभारी तहसिलदार श्रीकृष्‍ण ठाकूर, शासकिय सदस्‍य मुख्‍याधिकारी नगर पंचायत देवगड सुरज कांबळे,अ.का. कैलास गावडे,शिवराज चव्‍हाण, प्रदिप कदम , प्राजक्‍ता चिंदरकर आदी उपस्थित होते.

या सभेत बोलताना किंजवडेकर यांनी संजय गांधी योजना कार्यालयातील कर्मचारी उत्‍तम काम करीत असून आम्‍ही देखील प्रस्‍ताव पुर्ततेसाठी सहकार्य करू अशी त्‍यांनी ग्वाही दिली या बैठकित संजय गांधी योजनेअंतर्गत २७ ,वृध्‍दापकाळ योजने अंतर्गत ४ व श्रावणबाळ योजनेंतर्गत १८ प्रस्‍ताव मंजूर करणेत आली आहेत.