कणकवलीत राष्ट्रीय लाईनमन दिना निमित्त महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढली विजेच्या बचतेसाठी जनजागृती रॅली

66

कणकवलीत राष्ट्रीय लाईनमन दिना निमित्त महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढली विजेच्या बचतेसाठी जनजागृती रॅली

कणकवली( तुळशीदास कुडतरकर)दि ४ मार्च २०२४

राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातून विजेच्या बचतेसाठी जनजागृती रॅली काढली.

‘ऊर्जा वाचवा, देश वाचवा’, ‘आपल्या छोट्या छोट्या कृतीतून ऊर्जा वाचवू शकता’, ‘ऊजेचा गैरवापर केल्यास भविष्यात अडचण येऊ शकते’, ‘विद्युत उपकरणे वापरत नसाल तेव्हा ती बंद करा, ‘प्रकाशाची आवश्यकता नसते तेव्हा वीज बंद करा’, ‘वीजसंबंधीची उपकरणे आयएसआय मार्क असलेली वापरा’, अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या.

या रॅलीत महवितरणचे उपकार्यकारी अभियंता समीर अत्तार, विलास बगाडे, शाखा अभियंता श्रीराम राणे, प्रगती परसगडे, अमोल थोरबोले, सुरेश शिंदे, नितीन कांबळे, भीम गायकवाड, चुदाजी मोरये, आनंद आरोलकर यांच्यासह ४० ते ५० कर्मचारी सहभागी झाले होते. ही रॅली कणकवली महावितरण कार्यालय ते पटवर्धन चौक ते पुन्हा महावितरण कार्यालय पर्यंत काढण्यात आली.