- बांदा ,डिंगणे,नेतर्डे,डोंगरपाल, गाळेल वाहनचालक स्थानिक शेतकर्यांना गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस यांचा नाहक त्रास
माजी आमदार परशुराम उपरकर याचे समर्थक अंकुश उर्फ नाना सावंत यांचा आरोप
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेणार
अन्यथा सिंधुदुर्ग आरटीओकडे तक्रार करून गोवा पासिंग गाड्या सिंधुदुर्ग तपासणी नाक्यावर रोखण्यात येतील : नाना सावंत
बांदा (प्रतिनिधी)दि १ मार्च २०२४
गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाडीमालकांना नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास येत आहे. सिंधुदुर्ग (बांदा पत्रादेवी) सिमाभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या ये जा करताना नाहक त्रास गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून होत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर याचे समर्थक तथा बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश उर्फ नाना सावंत केला आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार उपरकर यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
बांदा बाजारपेठेत जीवनावशक वस्तूंच्या खरेदीसाठी व दैनंदिन कामासाठी,पेट्रोल भरणे आदी कामासाठी आले तरी या वाहनचालकांना या गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस हे नाहक त्रास देतात. कारण डिंगणे,नेतर्डे,डोंगरपाल , गाळेल व आजूबाजूच्या गावातील लोकांना स्थानिक शेतकरी यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी बांद्याला यावं लागत आणि या प्रवासाला सुद्धा या पोलिसांचा त्रास होत असतो.
या गोष्टीला वेळीच गोवा प्रशासनाने आळा घालावा अन्यथा आम्ही आमच्या सिंधुदुर्ग आरटीओकडे तक्रार करून गोवा पासिंग गाड्या सिंधुदुर्ग तपासणी नाक्यावर रोखण्यात येतील. असा इशाराही सावंत यांनी दिला आहे. जशास तसे उत्तर गोवा प्रशासनास आम्ही देऊ त्यापुर्वी लवकरच या विषयावर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार जीजी उपरकर यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेणार असे बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक अंकुश सावंत,आदेश सावंत,बाळा बहिरे व पदाधिकारी यांनी सांगितले.





