बांदा शहरात शिवजयंती सोहळा ढोल ताशांच्या गजरात व पारंपरिक प्रभातफेरीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
बांदा (मंगल कामत)
शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने अवघी बांदा नगरी भगवी झालेली पाहायला मिळाली. बांदा दशक्रोशीतील शेकडोच्या संख्येने नागरिक शिवप्रेमी उपस्थित होते.
हर हर महादेव, ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या जय घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पारंपरिक वेशभूषेत आबालवृद्धांसह महिला व तरुणयांनी प्रभातफेरीत सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गडगेवाडी येथून सकाळी प्रभातफेरीला प्रारंभ झाला. त्यानंतर गडगेवाडी, निमजगा, कट्टा कार्नर, खेमराज हायस्कुल, बांदेश्वर मंदिर पर्यंत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. स्थानिक युवती व महिलांनी लेझीम नृत्ये सादर केली. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज जन्म सोहळा संपन्न झाला. यावेळी महिलांनी पाळणा गीते सादर केली. देवगड येथील ढोलपथक यावेळी लक्षवेधी ठरले.
यावेळी खासदार विनायक राऊत, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, माजी सभापती बाळा गावडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, माजी पचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, साईप्रसाद काणेकर, मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष विराज परब, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, समीर परब, राकेश परब, भूषण सावंत, बाळा आकेरकर, मकरंद तोरसकर, ज्ञानेश्वर सावंत, बाबा गाड, दीपक सावंत, म.गो.सावंत, निलेश कदम, अवंती पंडित, आदींसह शिवप्रेमी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
मनोज कल्याणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली होती. यावेळी स्थानिक कलाकारांनी वेशभूषा साकारल्या होत्या. शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांद्यात शाळा,महाविद्यालय,विविध मंडळांनी शिवजयंती उत्सव मोठ्या भक्तीभय वातावरणात सपन्न झाला.
यावेळी विविध मंडळानी श्री छत्रपती व मावळे यांची वेशभूषा केलेली रॅली उत्सवास रंगत आली होती. या कार्यक्रमात महिलां वर्गांचे मोठा सहभाग दिसून आला.
या सोहळ्यासाठी बांदा शहरात ठिक ठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आल्याने अवघे वातावरण भगवेमय झाले होते. यांच्यासह बांदा तसेच दशक्रोशीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.





