गोगटे वाळके कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे व्याख्यान

92

गोगटे वाळके कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे व्याख्यान

बांदा (मंगल कामत)दि. १५ फेब्रुवारी २०२४

पानवळ येथील रावसाहेब गोगटे कॉलेजच्या वाणिज्य आणि लेखाशास्त्र विभागामार्फत शनिवार ता१७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्राचा मुख्य विषय ‘ शाश्वत पर्यटन व्यवसाय आणि कचरा व्यवस्थापन: ग्रामीण भारतासाठी नव उद्योजकता क्षेत्र’ आहे. चर्चासत्र सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल.
चर्चासत्राला कोकणातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी संघर्ष करणारे सुप्रसिद्ध युवा
कार्यकर्ते व रानमाणूस युट्यूब चॅनलचे संचालक श्री प्रसाद गावडे आपल्या बीजभाषणाने संबोधित करणार आहेत. हे बीजभाषण ११ वाजता होणार असून सर्वासाठी खुले आहे. चर्चासत्रात त्यानंतर तीन सत्रे होणार त्यात कचरा व्यवस्थापन, शाश्वत पर्यटन व्यवसाय, बचत गटांसाठी पर्यटन व्यवसाय आदी विषयांवर शोधनिबंध व चर्चा केली जाणार आहे. यासाठी इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित रहातील.