देवगड जामसंडे न.पं.चे १२ कोटी ८९ लाख ६१ हजार बारा रूपये रकमेचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर
देवगड : प्रतिनीधी
देवगड जामसंडे न.पं.चा आरंभीची शिल्लकीसहीत अखेर शिल्लक असलेले १२ कोटी ८९लाख ६९ हजार बारा रूपयेचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
देवगड जामसंडे न.पं.ची अर्थसंकल्पीय सभा न.पं.सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे, पाणीपुरवठा सभापती संतोष तारी, बांधकाम सभापती तेजस मामघाडी उपस्थित होते.
देवगड जामसंडे न.पं.चा २०२४-२५ चा अर्थसंकल्प सभेत सादर करण्यात आला.यामध्ये महसुली जमा ४ कोटी ६८ लाख ८९ हजार, महसुली खर्च ४ कोटी ५३ लाख २९ हजार, भांडवली जमा २५ कोटी १ लाख ७० हजार, भांडवली खर्च २४ कोटी १० लाख एकूण जमा २९ कोटी ७० लाख ५९ हजार तर एकूण खर्च २८ कोटी ६३ लाख २९ हजार असा एकूण १ कोटी ७ लाख ३० हजाराचे शिल्लकी अंदाजपत्रक यामध्ये आरंभीची शिल्लक रक्कम ११ कोटी ८२ लाख ३१ हजार १२ वगळून एकूण १२ कोटी ८९ लाख ६१ हजार १२ एवढ्या रकमेचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले.





