भाजपचे ‘घर चलो अभियान’ ला बूथ ६१ व बुथ ६२ ला उत्स्फुर्त प्रतिसाद

138

 

केंद्र शासनाच्या योजना जनहिताच्या -सौ प्रियांका साळसकर. ; देवगडात भाजपचे ‘घर चलो अभियानाला  उत्स्फुर्त प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी)

देवगड शहरात बुथ ६१ व बूथ ६२ वर भाजपच्या वतीने घर चलो अभियान राबवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख प्रवासी कार्यकर्ता सौ.प्रियांका साळसकर(बुथ६१),व प्रवासी कार्यकर्ता सौ.वैशाली तोडणकर, शक्तीकेंद्र प्रमुख गणपत गावकर,बुथअध्यक्ष(६२)रवींद्र कोयंडे व बुध अध्यक्ष(६१)सचिन कदम,चारू सोमण,युवा मोर्चा शहरअध्यक्ष दया पाटील,तन्वी शिंदे,बबन मालंडकर, सौ मालंडकर आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या योजना सर्व सामान्यांपर्यंत
पोहचवण्यासाठी व लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते,आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणे, गावातील शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे,ग्रामपंचायत ग्रामसेवक, तलाठी आशा सेविका व विविध योजना लाभार्थी संवाद कार्यक्रम आज पार
पडला. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी
म्हणाले केंद्र शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने गरीब कल्याणच्या असून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत,उज्ज्वला गॅस,आत्मनिर्भर स्वनिधी योजनाह्या योजना सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या ठरल्या.यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी विविध योजनांची माहिती उपस्थित महिला व घरोघरी जाऊन ग्रामस्थांना दिली.