मळेवाड पंचक्रोशी परिसरातील गावांमध्ये ऑनलाइन बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, ग्रामस्थ करणार तहसीलदारांकडे तक्रार
सावंतवाडी (प्रतिनिधी)
ऑनलाईन गॅस बुकिंग करूनही मळेवाड येथे भारत गॅस धारकांना गॅस सिलेंडर न दिल्याने गॅस ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आता गॅस ग्राहकांना गॅस हवा असेल तर ऑनलाइन गॅस बुकिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे.मळेवाड पंचक्रोशी परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भारत गॅस धारक आहेत.आज मळेवाडीतील काही गॅसधारकांनी ऑनलाइन बुकिंग करून त्यांना ऑनलाईन बुकिंग झालेल्या चा मेसेजही पुन्हा आलेला आहे.मात्र ऑनलाईन बुकिंग चा मेसेज ग्राहकांना प्राप्त झाला असूनही गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या गाडी चालकाने गॅस देण्यास नकार दिल्याने गॅस ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.ऑनलाइन गॅस सिलेंडरचे बुकिंग असताना सिलेंडर गॅस वाहनधारकांने का दिला नाही? याची माहिती घेण्यासाठी ग्राहकानी गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सी संचालकांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सदर संचालकांनी फोन उचलला नाही.याबाबत गॅस ग्राहकानी लोकप्रतिनिधीकडे संपर्क साधला तहसीलदार श्रीधर पाटील यांची आपण भेट घेवून याबाबत तकार करूया असे सांगण्यात आले.





