आरोंदा येथे अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या दहा गाड्यांवर दंडात्मक कारवाई

439

आरोंदा येथे अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या दहा गाड्यांवर दंडात्मक कारवाई

सावंतवाडी – प्रतिनिधी

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोंदा येथे अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या दहा गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून गोव्या हद्दीत मोठ्या प्रमाणात विनापरवाना जांभा दगड खडी,वाळू मोठ्या प्रमाणात डंपर व आयशरने वाहतूक केली जाते.अशा वाहतुकीची माहिती सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना मिळतात त्यांनी आपल्या भरारी पथका समवेत आरोन्दा येथे आज पहाटे सात डंपर व तीन आयशर टेम्पो यावर कारवाई करून दाही गाड्या जप्त करण्यात आल्या आणि त्यानंतर जप्त केलेल्या गाड्या सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नेण्यात आल्या.अशा प्रकारच्या अवैध विनापरवाना वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईमध्ये सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, आजगाव मंडल अधिकारी विनायक कोदे,तलाठी संजय यादव,तलाठी संदीप चव्हाण,तलाठी सी नागराज,तलाठी स्वप्निल सोन्सुरकर,तलाठी प्रवीण पोले,तलाठी सचिन चितारी,तलाठी संतोष धोंड, कोतवाल दिनेश पेडणेकर आदींचा समावेश होता.सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पटकन केलेल्या विनापरवाना वाहतूकीवर कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे दाबे दणाणले आहेत.