मत्स्य जातीच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्गात उभारणार 40 ठिकाणी कृत्रिम मत्स्य भित्तीका देवगड येथे शुभारंभ
देवगड (प्रतिनिधी)
देशाच्या मत्स्योत्पादनाच्या अभ्यासामध्ये ६५ ठळक मत्स्यजातींपैकी ३५ मत्स्यजातींचे मत्स्योत्पादन शून्य झाले आहे. त्यामुळे मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन आणि मत्स्य प्रजातींचे संरक्षण काळाची गरज आहे म्हणून मानवनिर्मित साहित्य वापरून समुद्रात स्थानिक मच्छीमारांच्या संमतीने मत्स्य विभागातर्फे जिल्ह्यात कृत्रिम भित्तिका उभारण्याचा निर्णय झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 40 ठिकाणी कृत्रिम भित्तिका उभारण्यात येणार आहे. मासळी उत्पादनात वाढ,आपत्ती व्यवस्थापन किनारपट्टी संरक्षण, मासे पकडणे व्यवस्थित करणे आणि वाढवणे अशा विविध गोष्टींचा फायदा साठी कृत्रिम भित्तिका माध्यमातून होणार असल्याचा विश्वास सहाय्यक आयुक्त श्रीधर अलगिरी यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.
मत्स्य व्यवस्थापन व मत्स्य प्रजातींचे संरक्षण ही काळाची गरज लक्षात घेता मत्स्य व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मासळी उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी देवगड पवनचक्की ,झिपलाईन समोरील खोल समुद्रामध्ये कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या याचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त श्रीधर अलगिरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर मत्स्य विभाग महाकाल, मत्स्य परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर , देवगड फिशर में सोसायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे, देवदुर्ग मच्छीमार सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाळेकर,लक्ष्मण तारी, तारामुंबरी मच्छीमारी सोसायटीचे चेअरमन विनायक प्रभू,सागर मित्र, सुरक्षारक्षक, पर्यवेक्षक तसेच रापण संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक आयुक्त अलगिरी म्हणाले की, कोरल रिप्स सारख्या नैसर्गिक कडकांप्रमाणेच कृत्रिम रीपचा वापर माशांचा एकत्रित करण्यासाठी आणि माशांना राहण्यासाठी आणि वाढवण्यासाठी घर प्रदान करण्यासाठी किनारपट्टीवरील लाटांचे नुकसान कमी करण्यासाठी तसेच सागरी परस्थितीच्या उत्पादनांसाठी मदत करतात आणि कार्बन सिक म्हणून कार्य करतात तसेच मासळी उत्पादन आणि कार्यक्षेत्रात दोन ते तीन पट वाढ केली जाऊ शकते त्यामुळे इंधन आणि ऊर्जा खर्चात बचत होते आणि उत्पन्नामध्ये वाढ होते तसेच सागरी मासळीच्या पालनासाठी अनुकूल परिस्थिती प्रदान करतात आणि माशांसाठी अंडी आणि रोपवाटिका म्हणून कृत्रिम भित्तिका चांगल्या प्रकारे वापर होतो असेही सहाय्यक आयुक्त अलगिरी यांनी सांगितले.






