शिवसेना (उबाठा गट) देवगड तालुका कार्यकारिणीची ३१ रोजी बैठक
देवगड(प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दि. ०४ व ०५ फेब्रुवारी, २०२४ सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या आहेत .या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील शिवसेना (उबाठा गट) कार्यकारिणीची बैठक बुधवार दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना देवगड कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर सभेला शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर , कणकवली – देवगड विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली – देवगड विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत -पालव मॅडम उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख , महिला आघाडी, पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले असल्याची माहिती देवगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर यांनी दिली आहे.





