कै.डॉ.बी.बी.गायतोंडे यांना बांदा ग्रामरत्न पुरस्कार

94

कै.डॉ.बी.बी.गायतोंडे यांना बांदा ग्रामरत्न पुरस्कार

बांदा (मंगल कामत)

जागतिक आरोग्य संघटनेने माजी सल्लागार  व बांदा गावचे भुषण कै. डॉ.बी.बी.गायतोंडे यांना बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने मरणोत्तर बांदा ग्रामरत्न पुरस्कार देण्यात आला.

26 जानेवारीला 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बांदा गांधीचौक येथे आयोजित प्रतिवार्षिक एकत्रित झेंडावंदन कार्यक्रमाच्या वेळी या पुरस्काराचे वितऱण कऱण्यात आले.

डॉ.गायतोंडे यांची नात शर्वाणी प्रसाद गायतोंडे हिने बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते हा  पुरस्कार स्विकारला.

   असा पुरस्कार सुरु करण्याची संकल्पना  नागेश सावंत यांनी बांदा ग्रामपंचायतीकडे मांडली होती.त्यानुसार यंदा पासुनच या पुरस्काराचा आरंभ झाला.हा पहिलाच पुरस्कार कै. डॉ.बी.बी.गायतोंडे यांना मरणोत्तर देण्यात आला.निवेदन करताना बांदा ग्रा.पं.सदस्य रुपाली शिरसाट यांनी पुरस्काराच्या संकल्पनेची माहीती दिली.तसेच डॉ.गायतोंडे यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रातील महान कार्याची माहीती दिली.या सोहळ्याला बांदा  ग्रामपंचायत उपसरपंच जावेद खतिब,सर्व ग्रामपंचायत  सदस्य,विविध पदाधिकारी,शिक्षक,विद्यार्थी,व्यापारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते