कुणकेश्वर येथे घाडी समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५३ दात्यांनी केले रक्तदान
देवगड (स्वप्नील लोके)
घाडी समाज उन्नती मंडळ , कुणकेश्वर यांच्या माध्यमातून कुणकेश्वर – चांदेलवाडी येथे मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त
सोमवार दि.१५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये ५३ रक्तदात्यांनी अमूल्य असे रक्तदान करून सिंधुदुर्गातील गरजु रुग्णांप्रती आपल्या संवेदना प्रगट केल्या. शिबिराचे उदघाटन कुणकेश्वर सरपंच श्री महेश ताम्हणकर, कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री गुरुनाथ घाडी आणि पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे जिल्हा सदस्य श्री विजयकुमार जोशी आणि जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्गच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरवसे मॅडम आणि त्यांची टीम यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सर्व रक्तदात्यांचे व जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्गचे घाडी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.





