कणकवली : शिवसेना खास. अरविंद सावंत यांच्या सौजन्याने शिवसेना कनेडी, नाटळ, भिरवंडे पंचक्रोशीसाठी रुग्णवाहिका देण्यात आल्या. सदरच्या रुग्णवाहिकांचे शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. लोकार्पण करण्यात येणार आहे.
सदरच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी शिवसेना नेते खास. अरविंद सावंत, सचिव तथा खास. विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आम. वैभव नाईक, माजी. जि. बँक अध्यक्ष सतीश सावंत, सुशांत नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे यांनी उपस्थिती असणार आहे.
विभागातील सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखा प्रमुख यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी केले आहे.





