विलवडे (वरचीवाडी) नं.३ प्रशालेचा राैप्य महोत्सव सोहळा गुरुवारी              

67

विलवडे (वरचीवाडी) नं.३ प्रशालेचा राैप्य महोत्सव सोहळा गुरुवारी
             

बांदा

जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा,विलवडे (वरचीवाडी) नं.३ प्रशालेचे राैप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष म्हणून माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे व उद्घाटक  प्रमुख पाहुणे श्रीमंत युवराज लखम सावंत भोसले यांच्याहस्ते होणार आहे.                   

          विलवडे देवस्थान प्रमुख बाबुराव दळवी,सरपंच प्रकाश दळवी,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,माजी उपसभापती कृष्णा सावंत,उपसरपंच विनायक दळवी,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके,तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप दळवी,माजी सरपंच मोहन दळवी,विस्तार अधिकारी दूर्वा साळगांवकर,छत्रपती शिवाजी पतपेढी व्यवस्थापक सोनू दळवी,माजी केंद्र प्रमुख संदिप गवस,केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. 

           सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा,आरती,दुपारी १ वाजता महाप्रसाद व तीर्थप्रसाद, रात्रौ ८ वाजता महोत्सव कार्यक्रम सोहळ्याचे उद्धाटन,पाहुण्याचे स्वागत,दीप्रज्वलन,सत्कार,माजी शिक्षक सत्कार,त्यानंतर रात्री दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ,सिंधुदुर्ग यांचा ट्रीकसीन युक्त नाट्यप्रयोग ‘छिन्नमस्ता’ सादर होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास रहावे. असे आवाहन व्यवस्थापक विलवडे (वरचीवाडी) ग्रामस्थाकडून करण्यात आले आहे.