सावंतवाडी संजय गांधी निराधार योजनाच्या अध्यक्षपदी गजानन नाटेकर यांची बिनविरोध निवड

20

 

 

सावंतवाडी :- प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी गजानन नाटेकर यांची बिनविरोध झाली आली आहे.

गेले कित्येक दिवस सावंतवाडी तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या समिती गठीत करण्यात आली नव्हती.मात्र आता नव्याने गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना गटाचे आणि मंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.नाटेकर गेली वीस वर्षे या समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते.त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना हे अध्यक्षपद देण्यात आले आहे.या समितीत सदस्य म्हणून प्रांजल प्रशांत जाधव,शिवानी दिनेश पाटकर,शंकर संभाजी साळगावकर, महादेव आनंद पांगम,साबाजी देवू धुरी,संजय बाबुराव देसाई,विनोद सुखदेव सावंत,सत्तार महंमद पटेल,सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,सावंतवाडी नगरपंचायत चे मुख्याधिकारी सागर साळुंखे,सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची नावे समाविष्ठ आहेत.