मुंबई : महारेराने वसुली आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात सुरुवात केली असून त्याला अखेर यश आले आहे. मुंबई शहर, उपनगर, रायगड आणि पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी महारेराच्या आदेशाची अंमलबजावणी करून वसुली थकविणाऱ्या विकासकांच्या जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यास सुरुवात केली आहे. लिलावातून १०० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे ११८ प्रकरणातील तक्रारदार ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Home महाराष्ट्र मालमत्तेचा लिलाव | महारेराच्या पाठपुराव्यामुळे विकासकांकडून १०० कोटींच्या आदेशाची वसुली…!




