फिंगरप्रिंट, फेसलॉक, या ट्रोजनपुढे  सगळेच फेल; Android यूजर्ससाठी धोक्याचा इशारा

65

फिंगरप्रिंट, फेसलॉक, या ट्रोजनपुढे  सगळेच फेल; Android यूजर्ससाठी धोक्याचा इशारा

मुंबई :-

स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या जगण्यातला अविभाज्य घटक बनला आहे. सामान मागवण्यापासून बँकेच्या व्यवहारापर्यंत अनेक गोष्टी त्यावरून केल्या जातात; मात्र त्यामुळे जीवन सुखकर झालं असलं, तरी हॅकिंगसारखे प्रकार होत असल्यामुळे अत्यंत सावधगिरीने फोन वापरावा लागतो.

सध्या एका नव्या मालवेअरबद्दल तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. अँड्रॉइड युझर्ससाठी सिक्युरिटी रिसर्चर्सनी एक धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांना शॅमेलिऑन ट्रोजनची (Chameleon Trojan) एक नवी व्हर्जन सापडली आहे. तो ट्रोजन अँड्रॉइड फोनची सिक्युरिटी बायपास करून पासवर्ड आणि अन्य डिटेल्सची चोरी केली जात आहे. हा मालवेअर अ‍ॅक्सेसिबिलिटी सेटिंगचा वापर करतो. तसंच, फोनचा फेस आयडी आणि फिंगरप्रिंट लॉक डिसेबल करतो.
थ्रेट फॅब्रिकच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगल क्रोमसारख्या अँड्रॉइड अ‍ॅप्ससोबत हा मालवेअर स्वतःला जोडून घेतो. बलीपिंग कम्प्युटरच्या रिपोर्टनुसार, मालवेअरवर काम करणाऱ्या थ्रेट अ‍ॅक्टर्सनी असा दावा केला आहे, की शॅमेलिऑन ट्रोजन बंडल रनटाइममध्ये डिटेक्ट केला जाऊ शकत नाही. त्यामुळे तो डिव्हाइसवर चालू असलेल्या गुगल प्रोटेक्ट अलर्ट आणि सुरक्षितता सॉफ्टवेअरला बायपास करण्याची परवानगी देतो. जुन्या व्हर्जनमध्ये हा मालवेअर अ‍ॅक्सेसिबिलिटी सेटिंगच्या माध्यमातून काम करत होता; मात्र नव्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये तो गुगल सिक्युरिटी रिस्ट्रिक्शनमुळे थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करतो.
आता हा मालवेअर एचटीएमएल पेज दाखवतो. तिथून युझर्सना अ‍ॅपची सर्व्हिस इनेबल करण्याची पद्धत वापरली जाते. त्यामुळे तो अँड्रॉइडच्या सिक्युरिटीला बायपास करतो आणि ऑन स्क्रीन पासवर्ड आणि डेटा चोरतो. हा मालवेअर बॅकग्राउंडलाही काम करतो. त्यामुळे पासवर्डच्याच मदतीने सर्व संवेदनशील डेटाही गोळा करतो.

बचाव कसा करायचा?

सिक्युरिटी रिसर्चर्सनी सांगितलं, की हा मालवेअर डिलिव्हर करण्याची पद्धत एपीके फाइल आहे. म्हणजेच हा मालवेअर थर्ड पार्टी वेबसाइट आणि अ‍ॅप्सच्या माध्यमातून डिस्ट्रिब्युट केला जात आहे. या मालवेअरपासून वाचण्याची एकमेव पद्धत म्हणजे फोनमध्ये कोणतीही अ‍ॅप्स थर्ड पार्टी वेबसाइट्सवरून डाउनलोड करू नयेत. तसंच, अशा अ‍ॅप्सच्या अ‍ॅक्सेसिबिलिटी सेटिंग्जना कोणत्याही गोष्टीचा अ‍ॅक्सेस देऊ नये. स्मार्टफोन अप-टू-डेट ठेवणं आणि वेळोवेळी गुगल प्ले प्रोटेक्टदेखील रन करत राहावं.