आंगणेवाडी यात्रेची जय्यत तयारी सुरू | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार भराडी देवीच्या दर्शनाला

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भराडी देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होते. या यात्रेसाठी सर्व ठिकाणाहून भावी लाखोच्या संख्येने भाविक येतात. गेले दोन-तीन वर्ष कोरोना संक्रमणामुळे भाविकांना येता आले नव्हते. यंदा मात्र भावीक विक्रमी संख्येने येतील अशी आशा आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी यंदा आठ रांगातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसामान्य रांगा, अतिमहनीय व्यक्तींसाठी रांगा तसेच अपंगांसाठीसुदधा विशेष रांग असणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आंगणेवाडी यात्रेला येणार असल्याने प्रशासनाकडून तसेच आंगणेवाडी ग्रामस्थांकडून जय्यत तयारी सुरू आहे.

यात्रेदिवशी सायंकाळी या ठिकाणी भाजपाने विशाल सभेचे आयोजन केले आहे. यासाठी भव्य आणि आकर्षक व्यासपीठ तयार केले जात आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत. मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तसेच वाहतूक नियोजन करण्यात येणार आहे.