आरती मासिक पुरस्कृत महिलांसाठी काव्यलेखन स्पर्धा.! ; सहभागी होण्याचे आवाहन.

49

सावंतवाडी : कविवर्य आरती प्रभू यांच्या स्मरणार्थ, चिंतामणी सहकारी प्रकाशन साहित्य संस्थांच्या वतीने प्रकाशित होणारे ‘आरती मासिक’ साहित्यिक मासिके, नियतकालीके, यांच्या तडझडीच्या काळातही सावंतवाडी सारख्या छोट्या शहरात गेली ३२ वर्षे नियमितपणे टीकून आहे. या मासिकाचे वितरण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरही होतं आहे. शिवाय कविसंमेलने, काव्यसंमेलने काव्यलेखन स्पर्धा, कथा-कविता-नाटक, कार्यशाळा, चर्चासत्रे असे अनेक उपक्रम राबवून साहित्यिक चळवळीत आपलं योगदान देत आहे. दरवर्षी होणारे निमंत्रितांचे विभागीय कवियित्री संमेलन आणि त्यानिमित्ताने महिलांसाठी काव्यलेखन स्पर्धा संस्थेच्या वार्षिक उपक्रमात महत्व राखून आहे.

यावर्षी २८ जानेवारी २०२४ रोजी होऊ घातलेल्या १७ व्या निमंत्रितांच्या विभागीय कवियित्री संमेलनाचे औचित्य साधुन यंदाही आरती मासिक नवोदित कवियित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धा जाहीर करत आहे. ही स्पर्धा सिंधूदुर्ग व गोवा राज्यासाठी मर्यादित असून १८ वर्षावरील महिलांनी आपल्या स्वरचित दोन कविता खालील पत्त्यावर पाढवून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आरतीचे संपादक श्री. प्रभाकर भागवत यांनी केले आहे. नव्या लिहित्या हातांचा शोध घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे, व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा हेतू आहे.

स्पर्धेचा निकाल संमेलनात जाहीर करण्यात येईल व विजेत्यांना आपली कविता निमंत्रित कवियित्रींच्या व्यासपीठावरून प्रत्यक्षात सादर करता येईल. यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तक भेट व बक्षीस (रोख रक्कम) देऊन सन्मानित करण्यात येईल. शिवाय स्पर्धेत निवडलेल्या कवितांना आरती मासिकमधून प्रसिध्दी देण्यात येईल. इच्छुकांनी आपल्या दोन उत्तम कविता पुढील पत्त्यावर पाठवाव्यात –
आरती सहसंपादिका –
उषा परब,
पत्ता – स्नेहांकुर, सर्वोदयनगर,
ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग ४१६५१०
(मो.बा. ९४२३८१८८२८)