बांदा : मडुरा – रेडकरवाडी येथील श्रीमती सावित्री विष्णू मोरजकर (८६) यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. बांदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मोरजकर यांच्या त्या आई होत.





