स्व. भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन.! ; २३ डिसेंबर रोजी आरपीडी प्रशालेत रंगणार स्पर्धा, आयोजकांनी केले सहभागाचे आवाहन.

43

सावंतवाडी : येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्यावतीने स्व. नामदार भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा २३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत आरपीडी प्रशालेत संपन्न होणार आहेत.  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिक्षक, व पालक यांनी प्रोत्साहित करावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

‘अशा’ गटात होणार स्पर्धा –

◆ स्पर्धक गट : छोटा गट- इ. 3 री ते 5 वी

चित्रकला स्पर्धेचे विषय – रंगभरण स्पर्धा (चित्र पूर्ण रंगवलेले असावे)

◆ स्पर्धक गट : मोठा गट – 06 वी ते 08 वी.

चित्रकला स्पर्धेचे विषय  – १) ग्राम स्वच्छता, २) जलदुर्ग – सिंधुदुर्ग २) वृक्षदिंडी

स्पर्धेचे अटी व नियम –

१) दिलेल्या कागदाच्या तुलनेने चित्र लहान नसावे.

२) रंगभरणसाठी चित्र स्पर्धेच्या विकाणी देण्यात पईल.

३) अपूर्ण चित्र विचारात घेतले जाणार नाही.

४) रंगसाहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावे,

५) एका शाळेतून मोठ्या गटासाठी जास्तीत जास्त 5 विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

६) चित्राच्या मागे उजव्या कोप-यात स्वतःचे व शाळेचे नाव, संपर्क क्रमांक लिहावे,

७) स्पर्धेची तारीख २३.१२.२०२३ वेळ-स.10 ते 12

८) चित्रात छापा प्रकाश व मानवाकृती प्रमाणबद्ध असाव्यात. पार्श्वभूमी-पूर्वभूमी विषयाला अनुसरून असावे..

९) रंग माध्यम। पेस्टल रंग, पॉटर कलर, पेन्सील कलर

१०) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

‘अशी’ आहेत पारितोषिके  –

छोटा गट- इ. 3 री ते 5 वी –

प्रथम पारितोषिक : रू. १०००/-, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,  व्दितीय पारितोषिक रू. ७००/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक : रू.५००/-, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र.,  उत्तेजनार्थ – उत्तेजनार्थ : ०२ विद्यार्थी, २.५००/-, प्रमाणपत्र.

मोठा गट – 6 वी ते 8 वी –

प्रथम पारितोषिक: रू.१०००/-, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व्दितीय पारितोषिक : रू.७००/-, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक : रू.५००/-, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र., उत्तेजनार्थ – उत्तेजनार्थ : ०२ विद्यार्थी, २.५००/-, प्रमाणपत्र.

तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

टीप: स्पर्धेच्या पूर्वनियोजनासाठी खाली दिलेल्या नंबरवर आपल्या शाळेची गटनिहाय विद्यार्थी नाव इयत्तेसह संख्या कळवावी, असे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी कळविले आहे.

संपर्क क्रमांक: श्री. योगेश गावीत सर – (कलाशिक्षक) – 9421300903.