अभिनंदनीय.! – सिंधुदुर्ग साहित्य संघाच्या अध्यक्षपदी लीलाधर घाडी, कार्याध्यक्षपदी विठ्ठल कदम.! ; कार्यवाहपदी मनोहर परब यांची एकमताने निवड.

81

सावंतवाडी : सिंधुदुर्ग साहित्य संघाच्या अध्यक्षपदी लीलाधर घाडी तर कार्याध्यक्षपदी कवी विठ्ठल कदम, कार्यवाहपदी मनोहर परब यांची एकमताने निवड करण्यात आली. संघाच्या श्रीराम वाचन मंदिरात झालेल्या बैठकीत नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. मावळते अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – उपाध्यक्षा प्रा. सुमेधा नाईक, कल्पना बांदेकर, सहकार्यवाह किशोर वालावलकर, खजिनदार राजेश मोंडकर, सदस्य प्रा. श्वेतल परब, प्रा. शालिनी मोहळे, हरिहर वाटवे, अॅड. संदीप निंबाळकर, एकनाथ कांबळे, मधुकर मातोंडकर, स्मिता खानोलकर, अॅड. देवदत्त परुळेकर.

सल्लागार-प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. शरयू आसोलकर, वीरधवल परब.

प्रास्ताविक विठ्ठल कदम यांनी केले. तर सिंधुदुर्ग साहित्य संघाचा आढावा प्रा. बांदेकर यांनी घेतला. डॉ. वसंत सावंत यांनी सुरू केलेली ही संस्था आहे. साहित्य संघाच्या माध्यमातून अनेक नामवंत कवी, साहित्यिक सिंधुदुर्गात आले. कोजागरी कवी संमेलनाच्या माध्यमातून अनेक नवोदीत कवींना व्यासपीठ मिळाले. हा परंपरा पुढे कायम ठेवूया, असे आवाहन त्यांनी केले.
नूतन अध्यक्ष लीलाधर घाडी यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने संस्थेची परंपरा पुढे नेऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी साहित्य वाचक स्पर्धा, काव्य संमेलन, लेखन कार्यशाळा अशा उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. ७ जानेवारीला साहित्य वाचक स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले.