वेंगुर्ला : अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त जनहिताचे कार्यक्रम राबवून समाज कार्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकांसाठीच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी केले.
वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात अल्पसंख्याक मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांचे स्वागत भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडिस यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना व्हिक्टर फर्नांडिस म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक व सामाजिक प्रगती झाली पाहिजे , व शैक्षणिक प्रगती झाली तरच आपोआप त्यांचा आर्थिक विकास होईल . यासाठी अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजनांची माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले.
अल्पसंख्याक विद्यार्थी , महीला , बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाखापर्यंत कर्ज, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी , महीला , बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत . मुस्लिम , ख्रिश्चन , शीख , पारसी , जैन , बौद्ध आणि ज्यु समाजातील पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा . महामंडळामार्फत २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते . अल्पसंख्याक महीला बचतगटांसाठी सुष्म पतपुरवठा योजना राबवली जाते. या अंतर्गत क्रेडिट लाईन १ मधील बचत गटातील प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये प्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते . त्याचा फायदा घ्यावा , असे आवाहन केले .
यावेळी अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा सरचिटणीस पदी रफिक गुडु शेख यांची , तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी उभादांडा मा. सरपंच इलीहास पेद्रु फर्नांडिस व वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी सायमन आल्मेडा यांची निवड करण्यात आली .
यावेळी महीला मोर्चाच्या हसिनाबेन मकानदार , रेमेत ब्रीटो , विन्सेंट डिसोझा , मुनीर बागवान , पारपेट डिसोझा , अब्दुल रेहमान शेख , फास्कु आल्मेडा , अस्लम मेहमूद शेख , रुजाय फर्नांडिस , मेहमूद मकानदार , ॲराॅन फर्नांडिस , ग्रेक फर्नांडिस , फीलीप आल्मेडा , लिना फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते .





