कुडाळ येथे मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.! ; २३ डिसेंबर २०२३ ते ९ जानेवारी २०२४ कलावधीत होणार संपन्न.

28

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित प्रवर्गासाठी नि:शुल्क निवासी उद्योजकता कार्यक्रम उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष, मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहीक प्रोत्साहन योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अठरा दिवशीय नि:शुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम २३ डिसेंबर २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत कुडाळ येथे घेण्यात येणार आहे. प्राप्त अर्जातून निवड समिती माफत मुलाखती घेऊन ४० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण प्रशिक्षण नि:शुल्क असून प्रशिक्षणार्थीची चहा, नाष्टा, भोजन व निवास व्यवस्था संस्थेमार्फत केली जाईल.

बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ रोजी या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उद्योजकता परिचय कार्यक्रमचे आयोजन समाजकल्याण कार्यालय हाॅल, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय विविध कर्ज योजना, सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, विविध क्षेत्रातील उद्योग संधी, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी तंत्र, उद्योग विषयक कायदे, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास. सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण. प्रकल्प अहवाल. जिल्हा उद्योग केंद्र च्या योजना. उद्योगांना प्रत्यक्ष भेटी याबाबत शासकीय अधिकारी व तज्ज्ञांमार्फत विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रममध्ये भाग घेण्यासाठी उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील  किमान सातवी पास, महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षापासून रहिवासी, उद्योग करण्याची प्रबळ इच्छा व १८ ते ५० वयोगटातील असावा.

इच्छुक अनुसूचित नव उद्योजक युवक – युवतींनी प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रव्दारा जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, सिंधुदुर्गनगरी, संपर्क क्रमांक ९४०३०७८७६८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.