सावंतवाडी : शहरातील बाहेरचावाडा दाऊद बेग घरामागील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत निर्लेखित केलेल्या शौचालयाच्या जागेत २४,५२,५८९/ रुपये एवढ्या रक्कमेच्या बहुउद्देशीय सभागृहाचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले.
हे काम माजी नगरसेवक नासिर शेख व माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाकार्यकारणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक नासिर शेख, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, जहूर शेख, गुलजार खान, नुमान आगा, सज्जाद खान, फरहाद बेग, नसीम बेग, नजनीन बेग, खालिद बेग, रवी नाईक, सचिन साटेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज सावंतवाडीतील बाहेरचावाडा येथे बहुउद्देशीय सभागृहाचे संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन.! ; नासिर...





