‘तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊ द्या.!’ ; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज.

39

नागपुर : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ”तुम्ही वरळीतून लढा, नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो.!” असे पुन्हा आव्हान दिले. त्यानंतर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुका ठाण्यातून लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज पुन्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चँलेज केले आहे. अनेक वेळा सांगितले, ”आज पुन्हा सांगतो तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊ द्या.!”, असे चँलेज आदित्य ठाकरेंनी चँलेज मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आज निवडणूक होत नाही याला आपण लोकशाही म्हणतो का? आपल्या राज्यात यांनी लोकशाही मारलेली आहे. मी मुख्यमंत्री यांना अनेकदा सांगितले तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून लढा नाहीतर मी तुमच्या समोर ठाण्यातून लढतो, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते : आदित्य ठाकरे

आदित्य  ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत. धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको. निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते. निवडणुका होत नाहीत, पुणे, चंद्रपुरात निवडणुका नाही सिनेटची निवडणुक देखील हे घेत नाहीत त्यांच्यात हिंमतच नाही.  हे घटनाबाह्य सरकार आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर : आदित्य ठाकरे

अधिवेशनात अनेक विषय चर्चेला येत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना इतर राज्यात हाजीर रहा असे सांगितले म्हणून ते राजस्थानला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महत्वाच्या चर्चेला नव्हते. मी काल AI चा मुद्दा उचलला. एआय हा मोठा घटक आहे . आरोग्य, शिक्षणासाठी एआय महत्वाचे आहे. एआयमुळे गुन्हे वाढू नये, देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्र सरकार कायदा तयार करत आहे. AI वापरायचे कसे यावर कसे यावर चर्चा होईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री काय उत्तर देणार?

या अगोदर अनेकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठाण्यातून निवडणूक लढण्याचे चँलेज दिले होते. आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देखील  दिले होते. “लोकशाहीत कोणाला कुठेही निवडणूक लढवण्याची मुभा आहे,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. आता पुन्हा आदित्य ठाकरेंनी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.