रोहा : शशिकांत मोरे
विम्याबाबत असंख्य योजना असलेल्या प्रख्यात अशा स्टार हेल्थ इन्सुरेंस कंपनीच्या रोहा शाखेचे नुकतेच रोह्यात शरद पवार भवन रोहा अष्टमी नगरपालिकेसमोरील धावीर मार्केट येथे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी असंख्य मान्यवर,विमा विक्रेते त्याच प्रमाणे विमाधारक उपस्थित होते.स्टार हेल्थ इन्सूरेंस शाखेचा शुभारंभ रोह्यात झाल्याने या परिसरातील असंख्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेली अनेक वर्षापासून असंख्य ग्राहकांची विश्वासाहर्ता जपत मेडिकल,अपघात,प्रवास तर विस्तृत कवर,मिड टर्म इंकुशन,डिलिवरी खर्च, नवजात शिशू कवर,होम केअर उपचार यासह असंख्य योजना असलेली या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे रोह्यात स्टार हेल्थचे वरिष्ठ अधिकारी मोहंती यांच्या शुभहस्ते फित कापून शाखेचे शुभारंभ करण्यात आले.याप्रसंगी राजा साहेब, मेहबुब शेख,मनीषा नागोठकर यांसह सहकारी वर्ग उपस्थित होते.याठिकाणी उपस्थितांचा सन्मान करण्यात आला.
स्टार हेल्थची आरोग्य पॉलिसी प्रत्येक रोहेकरांपर्यंत तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांपर्यंत पोहोचावी. त्याचप्रमाणे त्यांना सुविधा आणि मदत करण्यासाठी हे कार्यालय सुरू केले असल्याचे सांगून दीर्घकाल स्टार हेल्थ चे नाव राहावे त्यासाठी मनीषा नागोठकर यांच्या मार्फत या कार्यालयातून काम सुरू राहील असे वरिष्ठांनी या ठिकाणी सांगितले.
आज स्टार हेल्थचे नाव सर्वांना माहित आहेच, आरोग्य सेवा देणारी व ग्राहकांच्या आरोग्यामुळे खर्च भरून मिळावा यासाठी ही कंपनी आघाडीवर आहे. या कंपनीमार्फत तमाम रोहेकर आणि नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा देण्याचे काम आम्ही करणार आहोत.जर कोणी महिला,तरुण वर्ग,विमा एजेंट यांना या मार्फत काम करायचे असल्यास या ठिकाणी त्यानाही कामाची संधी उपलब्ध करून देणार आहोत.प्रत्येक ग्राहकांचे समाधान किंवा शंकेचे निरसन करण्यास आम्ही या कार्यालयामध्ये तत्पर असू असे अभिवचन नागोठकर यांनी दिले.
या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी असंख्य मान्यवर,विमा विक्रेते त्याचप्रमाणे विमाधारक उपस्थित होते.तर या परिसरातील डॉ .अभिजित जोशी,डॉ.भट, डॉ.चेतना जैन,डॉ.अशोक माळी यांसह विभागातील नागरिक,मित्र मंडळींनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त करीत समाधान व्यक्त केले.





