सावंतवाडी : सावंतवाडी केंद्रस्तरीय शालेय बाल कला – क्रीडा, ज्ञानी मी होणार.! या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिपाली भालेकर म्हणाल्या शालेय अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजे. यातूनच देशाचा भावी खेळाडू तयार होईल व भविष्यात देशाचे नाव रोशन करेल तसेच त्यांनी शिक्षकांचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त उपक्रमशील शिक्षक तथा नव्या शैक्षणिक धोरणाच्या सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे यांनीही या क्रीडास्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर व केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन विद्यार्थी व आयोजन समितीचे मनोबल वाढविले.
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, भरत गावडे, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर, अजित सावंत, भंडारे मॅडम, श्री. कित्तूर, कळसुलकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, श्री. पोवार सर, सौ. सायली लांबर, सौ. सावंत मॅडम, श्रीमती मीरा मुद्राळे, श्री. धोंडी वरक, सौ. संध्या बिबवणेकर, सौ. प्राची ढवळ, सौ. दिप्ती सोनवणे आदी मान्यवर तसेच सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.





