सावंतवाडी : तालुक्यातील डेगवे येथे दिनांक ११/१२/२०२३ रोजी काजू व कोको बोर्ड कोचीन, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने काजू पीक संरक्षण मोहिमे अंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले . सदर प्रशिक्षणास डॉ. विजयकुमार सीताराम देसाई कीटक शास्त्रज्ञ,
डॉ.एम. पी.सणस, कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता, श्री. एल. एस. खापरे कनिष्ठ काजू पैदासकार,
डॉ. गोपाळ, श्री. गोळवणकर संशोधन सहयोगी हॉर्टसप आंबा हे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे श्री. भुईम्बर, श्री. घाडगे, श्री. निकम , श्री.अतुल माळी, यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले .
त्यानंतर दुपारी काजू बागेमध्ये पीक संरक्षण विषयी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आणि रब्बी हंगामात होणा-या
मिरची पिकावरील वरील चुरडा मुरडा नियंत्रणाबाबत आणि गादीवाफ्यावरील भुईमूग लागवड बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग तसेच गावचे सरपंच श्री. राजन देसाई तसेच आत्मा बीटीएम मिनल परब उपस्थित होत्या. गावातील व क्षेत्रीय संपूर्ण नियोजन श्री. अतुल माळी (कृषी सहायक डेगवे) व श्री. आबा देसाई, प्रगतशील शेतकरी, डेगवे यांनी केले होते.
सदर कार्यक्रमाला सरपंच श्री. राजन देसाई , प्रगतिशील शेतकरी आबा देसाई, चंद्रशेखर देसाई, नाना देसाई आणि डेगवे व पडवे माजगाव गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.





