आशिष सुभेदार यांचा वाढदिवस ‘मनसे’ साजरा.! ; माजी आमदार परशुराम उपरकर व पदाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा.!

19

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी मनसे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांचा वाढदिवस मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. उपरकर यांनी आशिष सुभेदार यांच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मालवण माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, बांदा माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत, आरोस माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे, डिंगणे माजी शाखाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य आदेश सावंत, इन्सुली माजी शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, दिनेश मुळीक, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव निलेश देसाई, सहसचिव आबा चिपकर, विजय जांभळे, नंदू परब, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदेश सावंत, शहराध्यक्ष स्वप्निल जाधव, विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी, उप तालुकाध्यक्ष प्रणित तळकर, शुभम सावंत, दादा पालकर, गिरगोल दिया, सुनील नाईक, ज्ञानेश्वर नाईक, विशाल बर्डे, संतोष सावंत, गौरीज अमरे, गॅब्रियल फूडताडो आदी आजी-माजी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.