बांदा : येथील गोगटे – वाळके महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत ‘आव्हान २०२३’ या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरासाठी निवड चाचणी प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड चाचणी प्रक्रिया ही मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार बुधवार दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या कालावधीत होईल. या प्रशिक्षण शिबिराच्या निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा प्रत्येकी एक स्वयंसेवक (मुलगा) व एक स्वयंसेविका (मुलगी) पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रा. वासिम सय्यद, गोगटे – वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जी.जी. काजरेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. किशोर म्हेत्री यांनी केले आहे.
दिलेल्या वेळेत स्वयंसेवकांची मैदान चाचणी , शारीरिक चाचणी अशा प्रक्रियेतून अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून निवड झालेल्या स्वयंसेवकांना राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.





