वेंगुर्ला : हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ, वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ खर्डेकर महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवक – युवतीनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान शिबीर यशस्वी केले .
रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांना पुष्पहार अर्पण करून, तसेच दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .
या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की, रुग्णसेवेमध्ये रक्तदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे . रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्त जेंव्हा अनिवार्य असते तेंव्हा ते मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागते . रक्तदात्यांना संघटीत करून एकत्र आणण्याच्या दृष्टीने एकच व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार घेऊन , रक्तदान ही चळवळ बनवुन काम करणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे कौतुक केले. तसेच युवा पिढीमध्ये रक्तदानाची आवड निर्माण केल्याबद्दल हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाचे आभार मानले.
उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ॲड. मनीष सातार्डेकर यांनी प्रसन्ना देसाई , शाम कौलगेकर , सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान चे ॲलीस्टर ब्रीटो , कोल्हापूर जिल्हा रक्तपेढीचे डाॅ. अजय शिराळे , निलेश गवस , सुरेंद्र चव्हाण इत्यादी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले .
यावेळी मंडळाचे योगेश गोवेकर , करण निरवडेकर , आनंद कळेकर , रुपेश सावंत , सचिन मांजरेकर , मनीष कळेकर , प्रफुल्ल सावंत , सौरभ धुरी , रामचंद्र सावंत , कौस्तुभ मयेकर ,वैभव भोसले, सौरभ भोसले, आस्वाद पोतनीस, भूषण सारंग,प्रशांत गावडे, कौस्तुभ गवस इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश गोवेकर यांनी केले .





