डोंगरपाल माऊलीचा जत्रोत्सव १३ डिसेंबर रोजी.!

22

बांदा : डोंगरपाल येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव देव दिपावलीच्या मुहूर्तावर बुधवारी १३ डिसेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल.

रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री कलेश्वर दशावतार मंडळाचा (नेरुर,कडाळ) नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती व डोंगरपाल ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे