नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अवकाळी पाऊस, पीकविमा, मराठा आणि धनगर यांच्या आरक्षणाचा मुद्दा यासारखे अनेक मुद्दे ऐरणीवर आहेत. या सर्व मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान या अधिवेशनासोबत विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेली शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी देखील सुरूच राहणार आहे.
Home ब्रेकिंग न्यूज राहुल नार्वेकर करणार ‘ओव्हरटाईम’ ; हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरू राहणार आमदार अपात्रता सुनावणी.





